फेक न्यूज : डेंजरस अफवांचा आधुनिक व्हायरस
तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत चलाखीने फेक न्यूज पसरवल्या जाण्याचा प्रकार आताशा फारसा नवीन राहिलेला नाही. पण कोणत्याही मार्गाने ओळखताच येणार नाहीत असे फेक न्यूजच्या पुढे जाणारे काही प्रकार आता मोठ्या प्रमाणावर घडू लागले आहेत. खरंच वाटेल असं खोटं बनवण्यासाठी इतके प्रगत तंत्रज्ञान वापरले जात आहे की, येणाऱ्या दशकात हे संकट अधिकाधिक गहिरेच होत जाणार आहे असे दिसते. त्याचं एक उदाहरण म्हणजे ‘डीपफेक’!.......